नांदेड जिल्ह्यामध्ये तीन शेतकऱ्यांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

नांदेड - सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

नांदेड - सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

नापिकीमुळे बॅंकेचे कर्ज फेडू न शकल्याच्या विवंचनेतून कोळनूर (ता. मुखेड) येथील शेतकरी नागनाथ चंदर पाटील (वय 45) यांनी बुधवारी (ता. 2) विषारी गोळ्यांचे सेवन केले. मुखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. निमगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी शंकर उमाजी गलांडे (वय 29) यांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. मनाठा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. दरसांगवी (ता. किनवट) येथील शेतकरी उत्तम राजू राठोड (वय 55) यांनी सततच्या नापिकीमुळे काढलेल्या बॅंकेच्या कर्जाची वेळेवर परतफेड होत नव्हती. वसुलीसाठी तगादा वाढल्याने त्यांनी काल सायंकाळी विष घेतले. मांडवी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

Web Title: Three farmers committed suicide in the district of Nanded