तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यू 

सुभाष बिडे
रविवार, 20 मे 2018

तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

घनसावंगी (जि. जालना) - घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील लघूसिंचन तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर तीन मुलींना वाचविन्यात ग्रामस्थान यश आले आहे. दरम्यान तीन ही मुलींचा मृतदेह तलावातुन बाहेर काढण्यात आले आहे.

मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील लघूसिचन तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या सहा मुली तलावात पाहण्यासाठी उतरल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने संगीता बजरंग रणमळे (वय. २२), सौमित्रा दत्ता सातपूते (वय. १६) जना भानूदास रणमळे (वय. १६) या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. तर कल्याणी मधुकर खोस, ज्योती अशोक हेमके यांच्या अन्य एक मुलीला वाचविन्यात ग्रामस्थाना यश आले आहे. दरम्यान तीनही मुलींचे मृत देह ग्रामस्थांनी तलावातुन बाहेर काढण्यात आले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three girls die drowning in the lake

टॅग्स