औरंगाबादेत तीनशे प्राणी अंधारात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद- थकीत बिल भरण्यासाठी वारंवार पत्रे दिल्यानंतरही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने महावितरण कंपनीने बुधवारी (ता. नऊ) सायंकाळी मुख्यालय व सिद्धार्थ उद्यानाची वीज तोडली. मुख्यालयाचे दोन लाख 79 हजार, तर सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे पाच लाख 89 हजार रुपये बिल थकीत आहे. महिनाभरातील महावितरण कंपनीची ही दुसरी कारवाई आहे. 

महापालिकेचा कारभार सध्या "रामभरोसे' सुरू आहे. अनेक दिवसांनंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारी मुख्यालयात येऊन तीन तास बसले. मात्र, ते वारंवार दौऱ्यावर व सुटीवर जात असल्यामुळे सध्या दफ्तरदिरंगाई सुरू आहे. दोन-पाच लाखांच्या थकीत बिलामुळे वारंवार महापालिकेवर नामुष्की ओढवत आहे. गेल्या महिन्यात वीज वितरण कंपनीने महापालिकेच्या एसटीपीची (मल-जल प्रक्रिया प्रकल्प) वीज तोडली होती. त्यानंतर बुधवारी मुख्यालय व सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयाची वीज तोडण्यात आली आहे. सिद्धार्थ उद्यानाचे पाच लाख 89 हजार रुपये, तर मुख्यालयाचे दोन लाख 79 हजार रुपये बिल थकीत असल्याने बुधवारी चार वाजता मुख्यालय आणि प्राणिसंग्रहालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे मुख्यालय अंधारात बुडाले. काही विभागांत बॅटरी लावून कामकाज सुरू होते तर काही विभागातील कामकाज बंद पडले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र पुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही. दुसरीकडे वीजबिलाचे धनादेश तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात वाघ, बिबटे, नीलगाय यासह सुमारे तीनशे प्राण्यांचा समावेश आहे. प्राण्यांच्या पिंजऱ्यातील पंखे, दिवे बंद झाले असून, पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred animals dark in Aurangabad