बीड जिल्ह्यात तीन अपघातात चौघे ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

बीड : विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातात चौघे ठार झाल्याच्या घटना शुक्रवारी (ता. १३) दुपारी जिल्ह्यात घडल्या. एक अपघात पाडळशिगी (ता. गेवराई), दुसरा अपघात मैंदा - पोखरी (ता. बीड) तर तिसरा अपघात केंद्रेवाडी (ता. अंबाजोगाई) येथे घडला.

बीड : विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातात चौघे ठार झाल्याच्या घटना शुक्रवारी (ता. १३) दुपारी जिल्ह्यात घडल्या. एक अपघात पाडळशिगी (ता. गेवराई), दुसरा अपघात मैंदा - पोखरी (ता. बीड) तर तिसरा अपघात केंद्रेवाडी (ता. अंबाजोगाई) येथे घडला.

बीडहून गेवराईकडे जात असलेल्या एका कारला (क्रमांक एम. एच. 03 बी. सी. 0782) व दुचाकीला पाठूमागून जात असलेल्या ट्रकने (क्रमांक जी. जे.01 सी. झेड. 5601) जोराची धडक दिली.एक कार व दुचाकीला गेवराईकडून येत असलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. पाडळशिंगी (ता. गेवराई) येथे घडलेल्या अपघातात दुचाकीवरील शेख अमेर (वय 30 रा. बीड) हे जागीच ठार झाले. तर, त्यांची पत्नी व मुलगा जखमी झाले. तर स्वीफ्टमधील शेख युसुफ शेख युनूस, सय्यद मंजूर मनोद्दीनजमीर, शेख जमीर शेख बाबमियां, शेख सादेक सिकंदर (सर्व रा. मासूम कॉलनी बीड) हे देखील जखमी झाले. अपघातात दुचाकीचा चक्काचुर झाला.

दुसरा अपघात बीड - परळी राज्य रस्त्यावरील मैंदा - पोखरी फाट्यावर घडला. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील (एम. एच. २३ एम. ५१४१) केशव फकीर लंबाटे (वय ४४) व कुंडलिक लक्ष्मण मुंडे मुंडे (वय ३८)(दोघेही ताडसोन्ना, ता. बीड) हे दोघे ठार झाले. तर, तिसरा अपघात आडस - अंबाजोगाई रस्त्यावरील केंद्रेवाडी (ता. अंबाजोगाई) जवळ घडला. दुचाकीला कारने धडक देऊन झालेल्या अपघातात विष्णू सदाशिव कोटे (वय ५८, रा. आडस, ता. केज) हे जागीच ठार झाले. तर, कारचालक संतोष रानबा सिरसट हे जखमी झाले.

Web Title: Three killed in road accident in Beed district