स्कॉर्पियो व दुचाकीच्या अपघातात तीन ठार; एक जखमी 

विलास शिंदे
रविवार, 30 डिसेंबर 2018

सेलू : परभणी रस्त्यावरील कवडधन पाटीजवळ स्कार्पियो व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरूण जागीच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता.३०) रात्री दिडच्या सुमारास घडली.

परभणीकडून येणारी स्कार्पियो (गाडी क्रमांक एम. एच. २२ यु ८२२२) व सेलूहून ढेंगळी पिंपळगावकडे जाणारी स्पेलेंडर दुचाकी (क्र. एम. एच. 20 ए. पी.४७९९) या दोन्ही वाहनांची कवडधन पाटीजवळ जोरदार धडक झाली. दुचाकीवरून चार तरूण प्रवास करीत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील सिद्धार्थ असाराम दवंडे( वय २८), अविनाश महादेव मकासरे( वय २८), सिद्धार्थ शेषराव मगर( वय ३०) यांचा जागीच मृत्यु झाला. तर कुलदिप आसाराम पंडागळे( वय २५ ) हा
तरूण गंभीर जखमी झाल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात
पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

सर्व तरुण ढेंगळी पिंपळगाव (ता.सेलू ) येथील रहिवाशी आहेत. अपघात एवढा भिषण होता की दुचाकीचा चुराडा झाला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बलवंत जमादार हे करत आहेत.

Web Title: Three killed in scorpio and two-wheeler accident; One injured