खाजेची भुकटी अंगावर टाकून तीन लाख लंपास 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 4 जुलै 2018

काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यात उभ्या असलेल्या अनोळखी युवकांनी त्यांच्या अंगावर खाजेचे पावडर टाकले. यावेळी त्यांचे अंग खाजण्यास सुरवात झाली.

नांदेड - दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या अंगावर खाजेची पावडर टाकून त्यांच्याकडील जवळपास तीन लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ही घटना वसरणी ते सिडको रस्त्यावर मंगळवारी (ता. 3) दुपारी घडली. मात्र बुधवारी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जुना कौठा येथील शंकर दुर्गाजी गोरे यांचे कौठा नाका येथे हार्डवेअरची दुकान आहे. या दुकानावर उधारीने घेतलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी आपल्या दुकानातून दोन लाख ८० हजार रुपये एका बॅगमध्ये भरून ते सिडको एमआयडीसीकडे दुचाकीवरून निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यात उभ्या असलेल्या अनोळखी युवकांनी त्यांच्या अंगावर खाजेचे पावडर टाकले. यावेळी त्यांचे अंग खाजण्यास सुरवात झाली. त्यानंतर वसरणी परिसरात असलेल्या एका पान शॉपसमोर आपली दुचाकी लावून बॅग पेट्रेाल टाकीवर ठेवली. मानेवर पडलेले पावडर धुन्यासाठी खाली उतरून पाणी घेत असतांना त्यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्यांनी वरील रक्कम असलेला बॅग लंपास केली. मानेवर पाणी टाकल्यानंतर ते आपल्या दुचाकीकडे गेले. यावेळी त्यांना बॅग दिसली नाही. त्यांना एकच धक्का बसला. त्यांनी लगेच नांदेड ग्रामिण पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केल्यानंतर बुधवारी (ता. 4) सकाळी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Three lakh stole at nanded