Covid-19 : जालना पन्नाशीकडे, आज एकाच कुटुंबातील तिघांना बाधा

महेश गायकवाड
Thursday, 21 May 2020

जालना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी व मुंबईवरून अंबड तालुक्यातील शिरनेर येथे परतलेल्या एका व्यक्तीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला.

जालना : मुंबईवरून जालन्यात परतलेल्या एका कुटुंबातील तीन व्यक्तीचे अहवाल आज (ता.  21) सकाळी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे आता जालन्यातील एकूण बधितांची संख्या 44 झाली आहे.

जालना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी व मुंबईवरून अंबड तालुक्यातील शिरनेर येथे परतलेल्या एका व्यक्तीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आज पुन्हा मुंबईवरून अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगावात आलेल्या एका कुटुंबातील पती-पत्नी व भाऊ असे तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर पिंपळगावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाचे पथक या गावात पोचले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. एकूण बधितांपैकी सात रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या 37 रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 

लाॅकडाउनमध्येच पुलावर तलवारीने केक कापून बर्थडे पार्टी
बदनापूर (जि.जालना) -
 मांजरगाव (ता. बदनापूर) येथे दुधना नदीच्या पुलावर सोमवारी रात्री तरुणाला आपल्या मित्रांसोबत तोंडाला मास्क न बांधता व तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले. दरम्यान, कोरोनाच्या महामारीत जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशासह जमावबंदी आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्या २० जणांविरुद्ध मंगळवारी (ता.१९) बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस जमादार रमेश बाबूराव चव्हाण यांनी तक्रार दिली. त्यानुसार, मांजरगाव येथील संशयित सचिन सखाराम आरसूळ याचा सोमवारी (ता.१८) वाढदिवस असल्यामुळे चक्क पुलावरच पार्टी भरविली. केक कापण्यासाठी धारदार तलवारही आणण्यात आली. 

दुधना नदीच्या पुलावर मोठी गर्दीही जमविण्यात आली. दुचाकीवर केक ठेवण्यात आला.  तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क न बांधता हा सोपस्कार झाला. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशासह जमाव आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन झाले.

याप्रकरणी  सचिन सखाराम आरसूळ याच्यासह अशोक भगवान आरसूळ, बाबासाहेब भगवान आरसूळ, प्रकाश पंढरीनाथ आरसूळ, सचिन जनार्दन आरसूळ, मेंदू भगवान डाके, लक्ष्मण मच्छिंद्र पाझाडे, रवी बन्सीलाल आरसूळ, भाऊसाहेब श्रीमंत डाके, अमोल बजरंग डाके, दीपक धुराजी आरसूळ, साईनाथ श्रीमंत पाझाडे, संकेत प्रभाकर आरसूळ, नाथा जमुनाजी काकडे, महेश तुकाराम डाके, प्रदीप नानासाहेब डाके, सतीश मधुकर कांबळे, गजानन हरिभाऊ आरसूळ, विशाल बबन वाकडे (सर्व रा. मांजरगाव) आणि नितीन पांडुरंग भांड (रा. ढोकसाळ ता. बदनापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.  याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती खेडकर करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three new Covid-19 cases In Jalna