फसवणुक करणारे परराज्यातील तिघे जण पकडले

arrest. jpg
arrest. jpg

हिंगोली : नांदेड येथील दोन विवाहित माहिलांना वाशिम येथे कामासाठी नेण्याचा बहाणा करून परराज्यात लग्नासाठी नेणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन व राजस्थानातील एकास आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) पोलिसांनी सोमवारी (ता.२८0  ताब्यात घेतले आहे .

परराज्यातील तिघे जण नांदेड येथे मागील आठ दिवसांपासून थांबले होते. यावेळी त्यांचे एका महिलेसोबत विवाहासाठी मुलीबाबत बोलणे झाले त्यानंतर त्या महिलेने दोन विवाहित महिलांना तुम्हाला कामासाठी वाशिमला जायचे आहे असे सांगून आज सकाळी या तिघांसोबत पाठवले. नांदेड अकोला बसमध्ये तीन व्यक्ती दोन विवाहित महिलांप्रवास करीत होत्या.

वारंगा फाटा गावाजवळ त्यातील एकाने आता तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे सांगून त्या विवाहित महिलेला अंगठी देण्याचा प्रयत्न केला. आपण फसवले गेल्याचे लक्षात येताच  त्या महिलांनी नांदेड घरच्या मंडळींना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर बस वाहकाला माहिती देण्यात  आली. वाहकाने या घटनेची माहिती चालकास देऊन बस थेट आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगितले. सकाळी 11 वाजता चालकाने बस पोलिस ठाण्यात नेली. पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी त्या तीन व्यक्तीसह दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com