दुचाकी आणि बसच्या अपघातात तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

वसमत ते नांदेड मार्गावर शहरापासून काही अंतरावर बस दूचाकी अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.६) दूपारी दीड वाजता घडली आहे. 

वसमत - वसमत ते नांदेड मार्गावर शहरापासून काही अंतरावर बस दूचाकी अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.६) दूपारी दीड वाजता घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत येथील संजय उत्तम कांबळे, खंडोजी मदन इंगोले, सुनिल सखाराम खरे हे त्यांच्या दूचाकी वाहनावर वसमत येथून नांदेड कडे जात होते. त्यांचे दूचाकी वाहन शहरापासून काही अंतरावर आले असता समोरून येणाऱ्या निजामाबाद ते औरंगाबाद बसच्या पाठीमागील चाकास दूचाकी धडकली. 

या अपघातात दूचाकी वरील तिघांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी वसमत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three people died in a bus and two wheelar accident