शोभेच्या दारूच्या स्फोटात एकाच घरातील तिघे ठार

अनिरुद्ध धर्माधिकारी
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

आष्टी (जि. बीड) : यात्रानिमित्ताने घरामध्ये साठा केलेल्या शोभेच्या दारूचा स्फोट होऊन एकाच घरातील तीघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज (शुक्रवार) शहरातील दारू गल्ली येथे घडली आहे.

सरफराज अल्लाऊद्दीन सय्यद (वय ३८), हर्जना बेगम सय्यद अल्लाऊद्दीन (वय ६०) व फैजान (वय १५) या मुलाचा मृतांमध्ये समावेश असल्याचे घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोट एवढा भयानक होता की घटना घडल्यानंतर सदरील घराजवळ जाण्यासही कोणी धजवेना. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने झालेली पडझड दूर करून मृतांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, जामखेड येथील नगरपालिकेचे अग्निशमन दलाची यंत्रना घटनास्थळी दाखल करण्यात आली होती. यामध्ये तीन मृतदेह आढळून आले असून, सायंकाळी सहा नंतरही ढासळलेल्या भिंती काढण्याचे काम सुरू होते. शहरातील शेकापूर रोडलगतच दारू गल्ली म्हणून भाग आहे. सध्या यात्रांचा हंगाम असल्याने येथील गल्लीतील घरामध्येच दारू साठा केला जातो. आज दुपारी अचानक ४:३० हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. शिवाय, घटनास्थळाहून वेगवेगळ्या स्फोटाचे आवाज ऐकण्यास मिळत होते. घरातील तिघेही मृत्यूमुखी पडल्याने नेमकी आग लागली कशामुळे झाली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: Three people killed in the ashti an explosion of ornamental liquor