लाचप्रकरणी तीन पोलिसांचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

बीड - खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 40 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील सहायक निरीक्षक नीलेश केळे, सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार व हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड या तिघांना आज पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले. खंडणीच्या गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटविण्यासाठी एकाकडून 80 हजारांची लाच मागण्यात आली होती. यातील 40 हजार रुपये स्वीकारताना शुक्रवारी झिरो पोलिस छत्रभूज थोरातला रंगेहाथ पकडण्यात आले होते. पाठोपाठ सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार व हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड यांनाही ताब्यात घेण्यात आले, तर नीलेश केळे व अन्य एक झिरो पोलिस अशोक हंडीबाग हे फरारी आहेत.
Web Title: three police suspend by bribe case crime

टॅग्स