गेवराईतील तीन वाळूमाफिया स्थानबद्ध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

बीड - बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या गेवराई तालुक्‍यातील तीन वाळूमाफियांवर शुक्रवारी (ता. दहा) जिल्हा प्रशासनाने झोपडपट्टीदादा प्रतिबंधात्मक कायदा (एमपीडीए) अन्वये स्थानबद्धतेची कारवाई केली असून, तिघांनाही औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात टाकले आहे. 

बीड - बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या गेवराई तालुक्‍यातील तीन वाळूमाफियांवर शुक्रवारी (ता. दहा) जिल्हा प्रशासनाने झोपडपट्टीदादा प्रतिबंधात्मक कायदा (एमपीडीए) अन्वये स्थानबद्धतेची कारवाई केली असून, तिघांनाही औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात टाकले आहे. 

सोमनाथ अर्जुन गिर्गे (रा. गंगावाडी, ता. गेवराई), संतोष बाबासाहेब शेजाळ, पंडित सुदामराव गाडेकर (दोघे, रा. रेवकी, ता. गेवराई) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध विविध ठाण्यांत बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या तिघांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन तिघांनाही स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तिघांनाही गेवराई ठाण्यात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात पाठविले. 

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर, गेवराई ठाण्याचे निरीक्षक सुरेश बुधवंत, सहायक निरीक्षक एस. डी. बुर्मे, सहायक निरीक्षक सचिन पुंडगे, पोलिस कर्मचारी विजय जोगदंड, सुबराव जोगदंड, मनोज वाघ, अभिमन्यू औताडे, नरेंद्र बांगर, शेख जुबेर, अमोल येळे, संजय सेलमोहकर, गणेश दुधाळ आदींचा कारवाईत सहभाग होता. 

भल्या पहाटे साखरझोपेतच पकडले 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हे शाखा, निवडणूक विभाग, गेवराई पोलिस व दरोडा प्रतिबंधक विभाग अशी चार पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना केली. तिघांनाही शुक्रवारी पहाटे ते गाढ झोपेत असतानाच ताब्यात घेतले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Three sand mafia in Gevarai