उमरग्याच्या कोविड रुग्णालयाचे आत्तापर्यंत तीन कर्मचारी पॉझिटिव्ह

CORONA-WARRIORS.jpg
CORONA-WARRIORS.jpg

उमरगा: शहरातील कोविड उपजिल्हा रूग्णालयातील तीन कर्मचारी आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. आठ व नऊ तारखेला पाठवण्यात आलेल्या स्वॅब तपासणीतील प्रलंबित असलेली १५ स्वॅबा अहवाल शुक्रवारी (ता.१०) दुपारी प्राप्त झाला असून त्यात चौदा जण निगेटिव्ह आले तर उपजिल्हा रुग्णालयातील एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आली आहे.

यापूर्वी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान शुक्रवारी एकाउपचारादरम्यान एका औषध विक्रेत्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला याची अधिकृत माहिती स्वॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजेल. कोविड उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी ( ता. आठ) आणि गुरुवारी ( ता. नऊ) ३२ जणांचे स्वॅब प्रलंबित होते त्या पैकी शुक्रवारी दुपारी पंधरा जणांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत.

त्यात उपजिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आली असून १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी एक कर्मचारी पॉसिटिव्ह होता त्याला उद्या शनिवारी (ता. ११ ) डिस्चार्ज देण्यात येईल तर महिला कर्मचारी दोन दिवसापूर्वी पॉसिटिव्ह  आली आहे. तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या ५२ झाली आहे.

दरम्यान शुक्रवारी सकाळी शहरातील एक औषध विक्रेते आजारी असल्याने कोविड रुग्णालयात उपचारास नातेवाईकांनी घेवून गेले असता त्यांचा स्वॅब नमूना घेवून उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला असून स्वब अहवाल प्राप्त झाला नसलातरी कोरोना संसर्ग आजाराची लक्षणे असल्याने कोविड नियमांनुसार आरोग्य कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com