बीड जिल्ह्यात तिघा जणांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

जिल्ह्यात तिघांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्याच्या घटना रविवारी (ता. १५) समोर आल्या. एक आत्महत्या बीड शहरात तर दोन  आत्महत्याच्या घटना गेवराई तालुक्यात घडल्या. 

बीड/गेवराई : जिल्ह्यात तिघांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्याच्या घटना रविवारी (ता. १५) समोर आल्या. एक आत्महत्या बीड शहरात तर दोन  आत्महत्याच्या घटना गेवराई तालुक्यात घडल्या. अशोक वाकडे, उद्धव आतकरे व लखन बनसोडे असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. 

बीड शहरातील अशोक वाकडे (वय ३५) यांनी रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर शहरातील अमरधाम येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुर्वी राजकारणात सक्रीय असलेले अशोक वाकडे मागील अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची मदत करत असत. 

गेवराई तालुक्यातील निपाणी येथील शेतकरी उद्धव आतकरे (वय ३५) यांनी घराबाहेरील गॅलरीत अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.

याच तालुक्यातील बाबुलतारा येथील कंपनीत नोकरी करणारा तरुण युवक लखन बाबासाहेब बनसोडे (वय २५ ) याने शनिवारी (ता. १४) गावी जात असताना माळहिवरा परिसरातील रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गळफास लाऊन स्वत:ची जिवनयात्रा संपविली. ‘मी एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत होतो’, यासह ‘आर्थिक परस्थितीतुन आत्महत्या करत आहे, माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये अशा मजकूराची चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three suicides in Beed district