या जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी एवढी सुविधा..! वाचून तुम्ही होणार थक्कच..

corona virus image.jpg
corona virus image.jpg

लातूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढत चालली आहे. पंधराशेच्या घरात हा आकडा गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा रुग्णासाठी खाटा (बेड) अधिकाधिक उपलब्ध करून ठेवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

यातून सध्या जिल्ह्यात दोन हजार ९८९ खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. सध्या फक्त ५३४ रुग्णावर उपचार सुरु असल्याने दोन हजार ४५५ खाटा शिल्लक आहेत. भविष्यात अचानक रुग्ण संख्या वाढली तर सोय व्हावी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने हे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

विविध रुग्णालय आणि कोविड सेंटर-उपलब्ध खाटा

  • बारा नंबर पाटी येथील मुला मुलींच्या वसतीगृह - १००० 
  • विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था- १००
  • सुपर स्पेशालिटी रुग्णालयात - २०१, 
  • कव्हा रस्त्यावरील समाजकल्याण वसतीगृह - ४८
  • उदगीरच्या सामान्य रुग्णालय- १००
  • उदगीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध निवासी शाळा -१८०
  • अहमदपूरच्या मुलांची शासकीय निवासी शाळा- १५०
  • औसा येथील मुलाच्या शासकीय शाळा - १००
  • निलंगा उपजिल्हा रुग्णालयात-  ५०
  • निलंग्याच्या कोविड केअर सेंटरमध्ये (दापका)- शंभर
  • जाऊच्या कोविड केअर सेंटरमध्ये-१००
  • देवणीच्या शासकीय वसतीगृहात- ७७ 
  • चाकूरच्या कृषी पी.जी. महाविद्यालयात- १००
  • लामजन्याच्या सामाजिक न्यायभवनात- १००
  • जळकोटच्या सामजकल्याण वसतीगृहात- ५० 
  • बावची (ता. रेणापूर) येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेत -१०८ 

खाजगी रुग्णालयात उपलब्ध खाटा 

गेल्या आठवड्यापासून खासगी रुग्णालये देखील कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी सरसावले आहेत.
यातूनच येथील विवेकानंद रुग्णालयात शंभर, अल्फा रुग्णालय ५०, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय शंभर, लातूर सुपर स्पेशालिटी ७५, फुलाबाई बनसोडे रुग्णालय ५०, उदगीरच्या उदयगिरी लायन्स आय रुग्णालय ५० असे एकूण दोन हजार ९८९ खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

५३४ जणावर उपचार सुरु  
लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पंधराशेच्या घरात गेली आहे. पण सध्या ५३४ जणावरच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे दोन हजार ४५५ खाटा शिल्लक आहेत. आरोग्य विभागाची तयारी असली तर नागरीकांनी स्वतःची काळजी अधिक घेण्याची गरज आहे.

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com