तीन वाहन चोरांच्या आवळल्या मुसक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

नारेगाव भागात रस्त्यावर उभी व राष्ट्रवादी भवन येथून दोन चारचाकी वाहने चोरणाऱ्या संशयित तिघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही
कारवाई गुरुवारी (ता. 25) करण्यात आली. त्यांच्याकडून दोन्ही वाहने हस्तगत करण्यात आली. 

औरंगाबाद - नारेगाव भागात रस्त्यावर उभी व राष्ट्रवादी भवन येथून दोन चारचाकी वाहने चोरणाऱ्या संशयित तिघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही
कारवाई गुरुवारी (ता. 25) करण्यात आली. त्यांच्याकडून दोन्ही वाहने हस्तगत करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, साबेर शब्बीर पठाण, जावेद गणी शेख (वय 20), शेख माजेद शेख अकबर (वय 23, तिघे रा. अंबरहिल, जटवाडा रोड) अशी संशयित तिघांची नावे आहेत. नारेगाव येथील पॉइंटवर किरायाने मुरलीधर गोपालसा मांडवगडे (रा. नारेगाव रोड) यांनी दहा जुलैला वाहन उभे केले होते. या वाहनाची चोरी झाली. ही बाब समजल्यानंतर मांडवगडे यांनी याबाबत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात गुन्हाही नोंद करण्यात आला. एमआयडीसी सिडको पोलिस वाहनाचा शोध घेत होते. त्यादरम्यान त्यांना साबेर पठाण याने सहकाऱ्यासोबत वाहन चोरल्याची माहिती समजली. त्यांनी साबेर पठाण, शेख माजेद, जावेद गणी यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तिघांची चौकशी केली. त्यावेळी राष्ट्रवादी भवन परिसरातूनही त्यांनी चारचाकी वाहन चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन्ही वाहने हस्तगत करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रगटीकरण पथकातील उपनिरीक्षक के. पी. अन्नलदास, हवालदार मुनीर पठाण, व्ही. एम. राठोड, शिपाई
शाहेद शेख, गणेश राजपूत, दीपक शिंदे, नितेश सुंदर्डे यांनी केली. 
 
मित्राच्या घरी ठेवली होती चारचाकी 
राष्ट्रवादी भवन व नारेगाव भागातून चारचाकी चोरून त्या साबेरने सावंतवाडी येथील मित्र संजय पवार याच्या घरी ठेवल्या होत्या. त्या पोलिसांनी हस्तगत केल्या. साबेर व जावेद पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. त्यांच्याविरुद्ध चिकलठाणा, जिन्सी, मुकुंदवाडी, सातारा ठाण्यात चोरी, लुटमारीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three Vehicle thief arrester at Aurangabad