तीन दुचाकींची एकमेकांना धडक ; तिघे गंभीर

दीपक सोळंके
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

भोकरदन (जि. जालना) : तीन दुचाकी एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रत्यक्षदर्शींनकडून माहिती मिळाली आहे. हा अपघात बुधवारी (ता.२९) दुपारी एकच्या सुमारास भोकरदन-सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मालखेडा पाटीजवळ घडला.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मालखेडा पाटीजवळ सिल्लोडहुन एका जडवाहनामागे भरधाव वेगाने येणारा दुचाकीस्वार साईड मारण्यासाठी अचानक समोर आल्याचे लक्षात येताच भोकरदनहुन सिल्लोड कडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने त्याला वाचवण्यासाठी ब्रेक लावल्याने त्यामागील दुचाकी पुढच्या दुचाकीवर जाऊन आदळल्या. त्यामुळे घडलेल्या या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले आहे. यातील सर्व जखमींना पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

यातील तीन जखमींना अधिक मार लागल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे नातेवाईकांकडून कळाले. या अपघातातील जखमींचे नावे मात्र, कळू शकली नाही.

Web Title: Three Vehicles Accident 3 Serious