अल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधिश (चौथे) हरीभाऊ वाघमारे यांनी मंगळवारी (ता. ११) सुनावली. 

शहराच्या खडकपूरा भागात एक युवती आपल्या घरी आई वडील कामाला गेल्याने एकटीच होती. या संधीचा फायदा घेऊन याच भागात राहणारा आरोपी सय्यद अफरोज सय्यद जाकेर (वय २०) हा ३० जून २०१७ला दुपारी पिडीत युवतीच्या घरात घुसला. तिचा विनयभंग करून थापड बुक्यांनी मारहाण केली. यावेळी पिडीत युवतीचा भाऊ घरी आल्याने तो पळू जाण्यापूर्वी त्याने हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

पिडीत युवतीच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात एक जूलैला घरात घुसून विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोज पांडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने यात आठ साक्षीदार तपासले. न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी सर्व पुरावे व साक्षीदार आणि पिडीत युवतीचा जवाब ग्राह्य धरून पोक्सो, विनयभंग या कलमान्वये आरोपी शेख अफरोज याला तीन वर्ष सक्त मजुरी व विविध कलमानव्ये रोख १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पिडीत बालिकेला द्यावी असेही आदेश दिले. फौजदार पांडे यांनी आरोपीची रवानगी नांदेड कारागृहात केली.

Web Title: Three years' rigorous wages in case of misconduct of minor girl