नातेवाईकाकडूनच विवाहितेवर तीनवर्षे अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

22 जुलै 2015 ला संशयिताने पीडितेला फोन करून तुझा पती त्याच्या मैत्रिणीला घेऊन आल्याची बतावणी केली. त्यामुळे पीडिता संशयिताच्या घरी गेली असता, त्याने मारहाण करीत तुझी रेकॉर्डिंग तुझ्या पतीला ऐकवतो अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर बदनामी करून पती व मुलांना जिवे मारतो, अशी धमकी देत 2015 ते 2018 दरम्यान वारंवार अत्याचार केला.

औरंगाबाद -  बदनामी करून पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देत एकाने नातेवाईक विवाहितेवर तीन वर्षे वारंवार अत्याचार केला. या प्रकरणात शनिवारी (ता.20) दुपारी पोलिसांनी संशयिताला अटक केली. धीरेंद्र पुरी (27, रा. एन-सहा, मथुरानगर) असे त्याचे नाव आहे. 

तीसवर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, वर्ष 2015 मध्ये धीरेंद्रसोबत तिची ओळख झाली. संशयित पीडितेला वारंवार फोन करून शरीर सुखाची मागणी करायचा; मात्र पीडिता त्यास नकार देत होती. 22 जुलै 2015 ला संशयिताने पीडितेला फोन करून तुझा पती त्याच्या मैत्रिणीला घेऊन आल्याची बतावणी केली. त्यामुळे पीडिता संशयिताच्या घरी गेली असता, त्याने मारहाण करीत तुझी रेकॉर्डिंग तुझ्या पतीला ऐकवतो अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर बदनामी करून पती व मुलांना जिवे मारतो, अशी धमकी देत 2015 ते 2018 दरम्यान वारंवार अत्याचार केला. प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित धीरेंद्रला सोमवारपर्यंत (ता.22) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. माने यांनी दिला. सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी युक्तिवाद केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three years sexual harassment by a relative