esakal | धावत्या जीपने घेतला पेट; औरंगाबाद-बीड महामार्गावरील थरार
sakal

बोलून बातमी शोधा

burning car

औरंगाबाद-बीड महामार्गावर रविवारी रात्री सात वाजता धावत्या जीपने पेट घेतला

धावत्या जीपने घेतला पेट; औरंगाबाद-बीड महामार्गावरील थरार

sakal_logo
By
दिलीप दखने

वडीगोद्री: औरंगाबाद-बीड महामार्गावर रविवारी रात्री सात वाजता धावत्या जीपने पेट घेतला. वडीगोद्रीजवळील या घटनेत जीप जळून खाक झाली. या वाहनातून इनामदार कुटुंबातील पाच सदस्य जात होते.

बीड येथून औरंगाबादकडे रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास खलील इनामदार कुटुंबातील पाच सदस्यांसह जात होते. वडीगोद्री परिसरात आल्यानंतर जीपच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे जीप थांबवून इनामदार यांनी पाहिले असता इंजिनने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत जीपबाहेर धाव घेतली.

औरंगाबादच्या नामांतरावर अजित पवार बोलले...

अशातच जीपने पेट घेतला. त्यामुळे पेटलेल्या भागावर माती टाकून आग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे लोळ वाढत राहिले. त्यानंतर जीप व आतील कागदपत्रे, साहित्य आगीत खाक झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट दिली.

(edited by- pramod sarawale)