सायबर मायाजाल..या टीप्स समजुन घ्या अन्यथा खात्यालाच बसेल कात्री 

मनोज साखरे
Monday, 23 December 2019

व्हॉटस्‌ऍप वापरणाऱ्यांवरही "हनी ट्रॅपर'ची नजर असल्याचे समोर आले आहे. फेसबुकवरून ओळख वाढवून, फसवी मैत्री करून, इतरत्र ठिकाणांहून मोबाईल नंबर मिळवायचे, अकाउंटवर पाळत ठेवत सर्फिंगच्या लास्ट सिनवरूनही ट्रॅपर अंदाज लावतात.

औरंगाबाद - फसवणुकीच्या पारंपरिक घटना वाढत असतानाच इंटरनेट युगात सायबर गुन्हेगारीतही वाढ होत आहे. वेळोवेळी सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीत बदल होत असल्याने अनेकांची फसवणूक होतच आहे. एकूण सायबर गुन्हेगारीत फसवणुकीची सत्तर टक्‍क्‍यांच्या आसपास व्याप्ती आहे. फसवणूक टाळण्यासाठी दक्ष राहण्याची, विचार व काळजीपूर्वक सोशल मीडिया हाताळण्याची गरज आहे. 

सायबर गुन्हेगारीची देशात मोठी व्याप्ती असून सायबर ऍटॅकर आपले जाळे पसरवीत आहेत. सोशल मीडिया युजर्सची संख्या, वाढते सायबर गुन्हे आणि यावर उपाययोजनांसाठी तोकडे उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे या गुन्हेगारीला आळा घालणे सहज आणि सोपे काम नाही असे असले तरीही सायबर गुन्हेगारीवर आळा घालणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. औरंगाबाद शहरातही सायबर गुन्हेगारीचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

गुन्ह्यांची स्थिती पाहिल्यास 2017 मध्ये सायबर गुन्हे घडले. यात नागरिकांच्या विविध तक्रारी पोलिस विभागाला प्राप्त झाल्या. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार 166 गुन्ह्यांची या वर्षात नोंद झाली. 2018 मध्ये केवळ 82 गुन्हे नोंदविण्यात आले. तर सप्टेंबर 2019 मध्ये 53 गुन्हे नोंद झाले आहेत. विशेषत: ऑनलाइन फ्रॉड, बदनामी, लालसा व आकस आदी सुमारे 30 टक्के गुन्हे घडत असून आर्थिक विषयक, फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती सत्तर टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे, अशी माहिती सायबर विभागाकडून देण्यात आली आहे. 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

काही टिप्स.. 

 1. स्वतःची माहिती ऑनलाइन अपलोड करताना काळजी घ्या. 
 2. उदा. तुमचा फोटो, व्हिडिओ, अकाउंट डिटेल्स ऑनलाइन सर्वजण पाहू शकतात. तुमचा फोटो मार्फ करून त्याचा गैरवापर, बदनामी केली जाऊ शकते. 
 3. स्वतःची वैयक्तिक संवेदनशील माहिती अर्थात कौटुंबिक माहिती, वैयक्तिक फोटो, पत्ते, मोबाईल क्रमांक टाकू नका, त्याचा गैरवापर होऊ शकतो. 
 4. बऱ्याच वेबसाईट प्रायव्हसी, सेटिंगची सेवा देतात. त्याचा वापर करून आपण ऍटॅकरपासून आपली माहिती सुरक्षित ठेवू शकतात. 
 5. प्रायव्हसी सेटिंगचा वापर करून आपण आपली महिती आवश्‍यक त्यांनाच दाखवू शकतो. 
 6. सोशल मीडियावर नवीन मित्र तयार करताना काळजी घ्या. व्यक्तींशी संपर्क झाल्यास त्वरित विश्‍वास ठेवू नका. सर्व बाबींची पडताळणी करा. शंकाही घ्या. 
 7. वेबसाईटवरील माहिती, ओळख त्याच व्यक्तीची असेल असे नाही. 

उघडून तर पहा-बोक्याने फोडली हॉटेलची काच; पोलिसांनी केली अटक   

Image may contain: text

पासवर्ड ठेवताना...

 • कमीत कमी आठ कॅरेक्‍टर असावे. 
 • अपर केस लोअरकेस, स्पेशल कॅरेक्‍टर ठेवा. 
 • परिणामी अंदाज लावण्यास अवघड असतो. 
 • पासवर्ड नियमित बदलावा व तो कुणालाच सांगू नये. 

सोशल राहण्यासाठी 
अशी घ्या काळजी 

लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील या प्रकारचे आक्षेपार्ह लेख, चित्र, कथन, चित्रफिती व इतर साहित्य सोशन नेटवर्किंग साइटवर अपलोड, पोस्ट करू नये. ज्यामुळे समाजात रोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न वाढू शकतो. यात गुन्हाही दाखल होऊ शकतो. 

असा आहे कायदा 
आयटी ऍक्‍ट 2000 व सुधारणा 2008 नुसार माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर करून खोटे प्रोफाईल तयार करणे, दुसऱ्यांच्या नावाचा वापर करणे, दुसऱ्यांची माहिती टाकणे, पासवर्ड हॅक करणे इत्यादीत कलम 66 (क) अन्वये तीन वर्षांची कैद व एक लाख दंडाची तरतूद आहे. 

व्हॉटस्‌ऍप वापरा जबाबदारीने 
व्हॉटस्‌ऍप वापरणाऱ्यांवरही "हनी ट्रॅपर'ची नजर असल्याचे समोर आले आहे. फेसबुकवरून ओळख वाढवून, फसवी मैत्री करून, इतरत्र ठिकाणांहून मोबाईल नंबर मिळवायचे, अकाउंटवर पाळत ठेवत सर्फिंगच्या लास्ट सिनवरूनही ट्रॅपर अंदाज लावतात.

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा    

मेसेज पाठवून कुठेतरी भेटल्याचा बनाव करून जवळीक साधतात. चॅटिंगचा एक रिस्पॉन्स मिळाला की, ते आधी मैत्री नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. छान-छान फोटो शेअर करून भुरळ पाडायची, प्रसंगी अश्‍लील मेसेजही सेंड करायचे. परत रिस्पॉन्स मिळाला की, मग ट्रॅपरची आशा बळावते. लगेचच प्रेमाचे नाटक करून इप्सित साध्य करायचे, अशी पद्धत आता ते वापरू लागले आहेत. 

हे वाचलंत का?- ...तर झाडे तोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी फटके दिले असते! - शरद पवार  

फेसबुक वापरताय, हे टाळा... 

No photo description available.

 • एफबीवर तुमचे लोकेशन अपडेट करू नका 
 • वैयक्‍तिक फोटो, माहिती टाकू नका 
 • नकारार्थी, चुकीचे, उग्र विचार मांडू नका 
 • अनोळखी व्यक्‍तींची फ्रेंड रिक्‍वेस्ट टाळा 
 • फ्रेंड लिस्ट वाढविण्याची स्पर्धा नको 
 • एफबीवरून मोबाईल नंबर देऊ नका 
 • दुसऱ्याबद्दल चुकीची, अपमानजनक कॉमेंट्‌स नकोच. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tips to Avoid Cyber Fraud