जिल्हा परिषदेकडून आज लोकअदालत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

उस्मानाबाद - नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. 26), गुरुवारी (ता. 27) सकाळी अकरा ते पाच या वेळेत लोकअदालत घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांतील ग्रामस्थांच्या तक्रारी, प्रलंबित कामे यातून निकाली काढण्यात येणार आहेत. 

उस्मानाबादमधील ग्रामविकास लोकअदालत प्रमुख व सहायक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), भूम येथील ग्रामविकास लोकअदालत प्रमुख व सहायक म्हणून प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं). उमरगा येथील ग्रामविकास लोकअदालत प्रमुख व सहायक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक मनरेगा प्रमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच संबंधित तालुक्‍याचे समाविष्ट अधिकारी, गटविकास अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील विभाग यांचाही यात सहभाग असणार आहे. उस्मानाबादमध्ये होणाऱ्या लोकअदालतीला उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब येथील नागरिकांनी, भूम येथे भूम, परंडा व वाशी, तर उमरगा येथे उमरगा व लोहारा येथील नागरिकांनी संपूर्ण कागपत्रांसह उपस्थित राहावे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर कामे प्रलंबित आहेत, त्यांचा निपटारा झालेला नाही अशा सर्व नागरिकांनी बुधवारी, तसेच गुरुवारी संबंधित ठिकाणी आवश्‍यक कागदपत्रे, पुराव्यासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी केले आहे. 

Web Title: Today's People's Court