स्वच्छतागृह मंजुरीसाठी अधिकारीच फोडत आहेत फाटे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

औरंगाबाद - महापौर भगवान घडामोडे यांनी दररोज तीन वॉर्डांना सकाळी सहा वाजता भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मंगळवारी (ता.20) त्यांनी स्वत:च्या वॉर्डापासून सुरवात केली. या पाहणीत स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत पाणंदमुक्‍तीसाठी सुमारे 100 लाभार्थ्यांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत; मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करून वैयक्‍तिक स्वच्छतागृह मंजूर करण्याचे टाळले. परिणामी या भागातील नागरिकांना उघड्यावर जावे लागत असल्याचे उघड झाले.

स्वच्छ शहर हे आमचे मिशन आहे, असे महापौरपदाचा पदभार घेतल्यानंतर श्री. घडामोडे यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी स्वच्छतेविषयक कामांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी दररोज सकाळी सहा वाजेपासून तीन वॉर्डांमध्ये जाऊन पाहणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी बुधवारपासून सुरवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी स्वत:चा वॉर्ड रामनगर, संजयनगर, संघर्षनगर व मुकुंदवाडी या भागात पाहणी केली. स्वच्छतेसह पाणी, पथदिवे, ड्रेनेज या सोयी-सुविधांविषयीची पाहणी करीत माहिती घेतली. विमानतळाच्या भिंतीलगत लोक उघड्यावर जातात या पाहणीदरम्यान तेथील नागरिकांनी सांगितले की, वैयक्‍तिक स्वच्छतागृहासाठी 100 नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केलेले आहेत; मात्र अधिकारी रहिवासी पुरावा, रजिस्ट्रीचे पुरावे देण्याची मागणी करून या योजनेचा लाभ देण्याचे टाळत आहेत. वास्तविक पाहता लाईट बिल असले तरी या योजनेचा लाभ दिला पाहिजे, असा नियम असताना अधिकारी मात्र फाटे फोडत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर महापौरांनी लाभार्थ्यांना वैयक्‍तिक स्वच्छतागृह योजनेचा लाभ देताना अनावश्‍यक कागदपत्रांऐवजी आवश्‍यक त्या कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ द्यावा. तसेच विमानतळाच्या भिंतीजवळ आणि मुकुंदवाडी भाजीमंडई येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराज पुतळा ते सोहम मोटर्सपर्यंत नवीन सर्व्हिस रोड तयार करण्याचेही आदेश महापौर श्री. घडामोडे यांनी दिले.

Web Title: Toilet branches have murmured approval for officers