सदाभाऊ खोतांच्या गाडीवर फेकले टोमॅटो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

परभणी : भाजीपाल्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना मंत्री केवळ पोकळ भाषा करीत असल्याचा आरोप करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने परभणीत बुधवारी (ता.26) कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर टमाटे फेकुन शासनाचा निषेध केला आहे.

कृषि व पणन राज्यमंत्री श्री.खोत हे बुधवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभासाठी परभणीत आले होते. समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.त्यानंतर दोन वाजता ते  पाथरीकडे रवाना होत असताना त्यांच्या वाहनाचा ताफा उड्डाणपुलावर आला असता येथे आधीच आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खोत यांचे वाहन पाहताच टोमॅटो फेकले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

टोमॅटो फेकल्यानंतर पुढील गोंधळ नको म्हणून ताफा पुढे पाथरीकडे निघुन गेला.संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे,उपाध्यक्ष केशव आरमळ, डिंगाबर पवार, भास्कर खटिंग, उस्मान पठाण, मुंजाजी लोडे आदी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

Web Title: tomato throws on Sadabhau Khot s vehicle