जालन्यात कोरोनाबळींची साठी 

उमेश वाघमारे 
Monday, 27 July 2020

जिल्ह्यात कोरोनबाधितांची एकूण संख्याही एक हजार ८५७ झाली असून, ६० जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. तर एक हजार २२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालना - शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या भरीसह मृत्यू संख्याही वाढ होत आहे. रविवारी (ता. २६) ३० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, एका ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर ६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनबाधितांची एकूण संख्याही एक हजार ८५७ झाली असून, ६० जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. तर एक हजार २२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा दणका सुरूच आहे. आतापर्यंत एक हजार ८५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचे मृत्यूही सुरूच असून, रविवारी शहरातील गुडलागल्ली परिसरातील ६० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णाला न्यूमोनिया व उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने ता. २० रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कोरोना अहवाल रविवारी (ता.२६) पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांचा उपचारादरम्यान रविवारी (ता. २६) सकाळी मृत्यू झाला. तर ३० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, रविवारी ६७ जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यात शहरातील संभाजीनगर येथील बारा, लक्कडकोट, मस्तगड येथील प्रत्येकी दहा, कसबा येथील सहा, तेरापंथी भवन येथील चार, गणपती गल्ली, जेईएस कॉलेज परिसर, सिंदखेडराजा येथील प्रत्येकी तीन, दुखीनगर, मंठा चौफुली, अमरछाया, कन्हैयानगर, दर्गावेस, सेवली (ता. जालना), ग्रीन पार्क, नळगल्ली, ख्रिश्‍चन कँप, गांधीनगर, जवाहरबाग, मोतीबाग, रामनगर, नागेवाडी, कालीकुर्ती, आष्टी येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. 

जिल्ह्यातील ७८७ जण संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यातील ७८७ जणांना रविवारी (ता. २६) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०५, मोतीबाग शासकीय मुलींचे वसतिगृह येथे सात, वनप्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे ४५, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे २१, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे ५४, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे २१, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ४९, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर डी ब्लॉक येथे ५४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर सी ब्लॉक येथे ९७, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर बी ब्लॉक येथे ८८, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे पाच, केजीबीव्ही येथे दोन, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे १३, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २४, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ६९, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २६, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे दोन, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे पाच, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे नऊ, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ४२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे चार, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे २१, आयटीआय कॉलेज येथे आठ, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे सात, पार्थ सैनिकी स्कूल येथे नऊजणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total sixty Death of corona patients in Jalna