जालन्यात कोरोनाबळींचा आकडा ३५ वर पोचला

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालना -  जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी (ता.नऊ) शहरातील दुखीनगर येथील ४८ वर्षीय एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनाबळींचा एकूण आकडा ३५ वर पोचला आहे. दरम्यान, गुरुवारी २४ बाधित रुग्णांची भर पडली, तर ११ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

जालना शहरातील दुखीनगर येथील ४८ वर्षीय पुरुषाला न्युमोनियाचा त्रास होत असल्याने ता. सात जुलैरोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. ता. आठ जुलै रोजी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना गुरुवारी (ता.नऊ) त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. गुरुवारी २४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण ८५२ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर आतापर्यंत ३५ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहेत. सध्या २७३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून २९ जण इतर ठिकाणी रेफर केले आहेत. 

दरम्यान, गुरुवारी २४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात महावीर चौक, अंबर हॉटेल परिसर, यशोदीपनगर, नाथबाबागल्ली, कॉलेज रोड, गोविंदपुरा, रूपनगर, साळेगल्ली, लक्कडकोट, पेन्शनपुरा, नाथनगर, रामनगर, कादराबाद चौक, जाफराबाद येथील बाजार गल्ली व सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील प्रत्येक एकजण, दुखीनगर येथील दोनजण, शिवनगर येथील तीनजण तर संभाजीनगर येथील चारजणांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर आतापर्यंत ५१५ जण कोरोनामुक्त झाले आहे. गुरुवारी (ता.नऊ) ११ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, यात कन्हैयानगर, बालाजीनगर, सतकरनगर, भोलेश्वरनगर, वसुंधरानगर, मोदीखाना दुखीनगर येथील प्रत्येक एक तर टेंभुर्णी (ता. जाफराबाद) येथील चारजणांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात ५५९ जण अलगीकरणात 

जिल्ह्यात ५५९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे तीन, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २४, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ६९, मुलींचे शासकीय निवासी वसतिगृह येथे सात, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ५७, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ४१, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे ६५, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे ९८, परतूर येथील केजीबीव्ही येथे नऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे दहा, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २७, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १३, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सहा, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १९, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १२, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ३८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ३९, जाफराबाद पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे १८, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे चार जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com