फिरत्या न्यायालयामार्फत 69 प्रकरणे निकाली 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 7 जुलै 2018

या पॅनल प्रमुखांनी कायद्याविषयक जागृती करून पीडित गरजू लोकांना विधी सेवा मोफत सल्ला देत असते असे सांगितले. महिला, अपंग व्यक्ती, बालक व ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींना मोफत विधी सहाय पुरविल्या जाते.

नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी आणि न्यायाधीश डी. टी. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात फिरते न्यायालय ही संकल्पना राबविण्यात आली. 5 जून ते 31 जूनदरम्यान ‘न्याय आपल्या दारी' याद्वारे 573 पैकी 69 प्रकरणे तडजोडअंती निकाली काढले. यातून जवळपास सव्वा लाखाचा महसुल जमा झाला. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशावरून येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश कुलकर्णी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किंवा न्यायाधीश वसावे यांनी फिरत्या लोकन्यायालयाद्वारे जिल्ह्यात सर्व तालुक्यात व मोठ्या गावात ही संकल्पना राबविली. या फिरत्या न्यायालय वाहनातून सेवानिवृत्त न्यायाधीश बी. टी. नरवाडे, के. एल. देशमुख यांच्यासह वकील मंडळीचा सहभाग होता.

या पॅनल प्रमुखांनी कायद्याविषयक जागृती करून पीडित गरजू लोकांना विधी सेवा मोफत सल्ला देत असते असे सांगितले. महिला, अपंग व्यक्ती, बालक व ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींना मोफत विधी सहाय पुरविल्या जाते. गावात सलोखा टिकवून ठेवून गाव तंटामुक्त करा, असे आवाहनही त्यांनी केले. न्यायालयात तीन कोटीहून अधिक प्रकऱणे प्रलंबित आहेत. 

लोकअदालतीच्या माध्यमातून आपली तडजोडअंती प्रकरणे मिटवून घ्यावे. जिल्ह्यातील पोलिसवाडी, जानापुरी, अंबुलगा, दाबका राजा, मुक्रमाबाद, नरंगल, बरबडा, गडगा, होट्टल, अर्जापूर, लोहगाव, बालापूर, नागठाणा, हळदा, मातुळ, बोरगडी, शिवणी, अंबाडी, पापलवाडी, निवघा, कोंढा, दरेगाव, जवळा (मुरार), गुंडेगाव आणि शेवट जिल्हा कारागृहात या फिरत्या न्यायालयाचा समारोप झाला.

यादरम्यान 573 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 69 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यासाठी अधिक्षक कल्पना कुलकर्णी, एन. सी. कावळे, व्ही. एम. वायगावकर, एस. यु. सोनवणे, ए. पी. सावळे यांच्यासह संगमेश्‍वर मंडगे, के. एच. महाजन आणि सुनील मुदीराज यांनीही परिश्रम घेतले. 

Web Title: Touring Court 69 Cases Have been Solved