पर्यटनात वेरूळची लेणी पुन्हा ‘फेव्हरेट’

Caves
Caves

जिल्ह्याला ३५ लाखांवर पर्यटकांनी दिली भेट; ६६ हजार ६१० विदेशी पर्यटकांचा समावेश
औरंगाबाद - जिल्ह्याला जागतिक स्तराची पर्यटनस्थळे लाभली असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ३५ लाख १८ हजार १२० पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद भारतीय पुरातत्त्व विभागाने केली आहे. यात वेरूळची लेणी फेव्हरेट ठरली आहे.

पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची घोषणा झाली असली, तरी त्याप्रमाणे पर्यटन विकास झालेला नाही. त्याचा परिणाम येणाऱ्या पर्यटकांवर पडताना दिसतो, तसेच दळणवळणाची व्यवस्था चांगली नसल्याने एका पर्यटनस्थळाला भेट देणारा पर्यटक दुसऱ्या पर्यटनस्थळाला भेट देत नसल्याचे चित्र पुरातत्त्व विभागाच्या वार्षिक अहवालात दिसत आहे. पर्यटकांची पहिली पसंती ही वेरूळ लेणीला असते, दुसरी अजिंठा आणि तिसरी पसंती बीबी-का-मकबरा असते. अन्य पर्यटनस्थळाला अपेक्षित पर्यटक भेट देत नाहीत.

२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण ३५ लाख १८ हजार १२० पर्यटकांनी भेटी दिल्या. यात ३४ लाख ५१ हजार ५१० भारतीय पर्यटक, तर ६६ हजार ६१० विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सर्वांत जास्त पसंतिस्थळात वेरूळ लेणीचे नाव आघाडीवर असून, येथे वर्षभरात १३ लाख २२ हजार ५२४ भारतीय पर्यटकांनी भेट दिल्या, तर २६ हजार २६९ विदेशी पर्यटक येथे आले होते. यानंतर बीबी-का-मकबरा येथे १२ लाख ६ हजार ६८७ भारतीय पर्यटक, तर १२ हजार १४५ विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या; तसेच अजिंठा येथे ३ लाख ५८ हजार १५४ भारतीय पर्यटकांनी भेटी दिल्या, तर २१ हजार ५४८ विदेशी पर्यटक येथे भेट देण्यासाठी आले आहेत. देवगिरी किल्ला येथे ४ लाख ५३ हजार ४०१ भारतीय, तर ५ हजार १३८ विदेशी पर्यटक आले, तसेच औरंगाबाद लेणी येथे १ लाख १० हजार ७४४ भारतीय, तर १ हजार ५१० विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.

संख्येत घट 
मागील आर्थिक वर्षात ३८ लाख ९०,७०७ पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या. यात ३८ लाख २१ हजार ७०७ भारतीय पर्यटकांची संख्या होती. तर ६८ हजार ९९६ विदेशी पर्यटक आले होते. यावर्षी तब्बल ३ लाख ७२ हजार ५८७ पर्यटक कमी झाल्याची माहिती अहवालातून समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com