जायकवाडी धरणावर पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

जायकवाडी धरण भरले असून, धरण बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धरण परिसर जिकडे-तिकडे गर्दीने फुलून गेला आहे. जायकवाडी धरणाच्या दरवाजांतून गोदावरी नदीपात्रात सोडले जात असलेले पाणी पाहण्याचा आनंद सर्वजण घेत आहेत. विशेषतः बच्चेकंपनी धरणाचे अथांग पाणी पाहून जाम खूश होत आहे. जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने रोज पर्यटक धरण परिसरात अलोट गर्दी करीत आहेत. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी जायकवाडी धरणाला भेट दिली असल्याचे प्रशासनाकडून कळते.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरण भरले असून, धरण बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धरण परिसर जिकडे-तिकडे गर्दीने फुलून गेला आहे. जायकवाडी धरणाच्या दरवाजांतून गोदावरी नदीपात्रात सोडले जात असलेले पाणी पाहण्याचा आनंद सर्वजण घेत आहेत. विशेषतः बच्चेकंपनी धरणाचे अथांग पाणी पाहून जाम खूश होत आहे. जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने रोज पर्यटक धरण परिसरात अलोट गर्दी करीत आहेत. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी जायकवाडी धरणाला भेट दिली असल्याचे प्रशासनाकडून कळते.

जायकवाडी धरणामुळे
लाखो रुपयांची उलाढाल

जायकवाडी धरणामळे मागील एक महिन्यापासून परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे मागील एक महिन्यापासून पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या अर्थकारणात भर पडली असून, व्यावासायिक, व्यापाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists Crowed At Jayakwadi Dam