नळदुर्ग किल्ल्याला प्रतीक्षा पर्यटकांची!  

naldurg1.jpg
naldurg1.jpg

नळदुर्ग (लातूर) : येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला कोरोना व अनलॉकच्या पार्श्वभूमीवर साडेसात महिन्यांनंतर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. पुरातत्त्व खात्याशी सामंजस्य करार केलेल्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेण्याच्या उद्देशाने किल्ल्यात जागोजागी सूचना फलक लावले आहेत. प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था केली आहेत. आता फक्त शासनाकडून पर्यटन स्थळे खुली करण्याच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कोरोनामुळे मागील साडेसात महिन्यांपासून नळदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद आहे. कोरोना संकटामुळे पर्यटकांना ऐतिहासिक किल्ल्यातील बहुप्रतिक्षित नरमादी धबधबा पाहण्याचा योग आला नाही. मात्र, दिवाळीत तरी किल्ला पर्यटनाचा आनंद घेता येणार का हे पाहावे लागेल. 

नळदुर्ग येथील भुईकोट किल्‍ला राज्‍य संरक्षित स्‍मारक महाराष्‍ट्र यांच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर किल्ला पर्यटकासांठी सुरू करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे; तसेच त्यादृष्टीने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळण्यासंबधी किल्ल्यात जागोजागी आवाहन करणारे फलकही लावले आहेत.

काळजी घेण्याच्या दृष्टीने किल्ल्यातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या हुलमूक दरवाजा, बारादरी येथे सॅनिटायझर टनेल उभे केले आहेत. विविध वास्तूजवळ फलक लावले आहेत. सध्या टप्प्याटप्प्याने अनलॉक केले जात असल्यामुळे पर्यटन स्थळे उघडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे पर्यटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्या दृष्टीने किल्ला प्रशासनानेही तयारी केली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com