ट्रॅक्‍टर घुसला घरात; दोन दुचाकींचा चुराडा

योगेश पायघन
शनिवार, 15 डिसेंबर 2018

औरंगाबाद : अमरप्रीत हॉटेलच्या मागच्या गेटमधून निघालेल्या डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर नियंत्रण सुटल्याने एका घरात घुसला. यात दुचाकीचा भुगा झाला. तर चंद्रशेखर पाठक यांच्या घराचे नुकसान झाले. शनिवारी (ता. 15) दुपारी एकच्या सुमारास श्रीनिकेतन कॉलनीत घडली. या प्रकरणाची नोंद क्रांती चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

दूध डेअरीच्या समोरच्या बाजूला असलेल्या श्रीनिकेतन कॉलनीत चंद्रशेखर विनायक पाठक यांचे घर आहे. याच कॉलनीत असलेल्या अमरप्रित हॉटेलच्या मागे गेट आहे. या गेटमधून शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक डेब्रिजने भरलेला ट्रॅक्‍टर (एमएच 20 एबी 7055) निघाला. त्या ट्रॅक्‍टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्‍टर चंद्रशेखर पाठक यांची संरक्षण भिंत तोडून त्यांच्या घरात घुसला.

दरम्यान, त्यांच्या भाडेकरुची दुचाकी (एमएच 20 सीएम 0247) ही ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरखाली चुरा झाली. तर अन्य एक दुचाकीचाही चुराडा झाला. याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त व उपायुक्तांना संपर्क साधला. मात्र, दिवसभरात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे चंद्रशेखर पाठक यांनी 'सकाळ''शी बोलतांना सांगितले.

Web Title: Tractor Inside Home Two Bikes Damaged in Aurangabad

टॅग्स