पावसाअभावी सहा एकरातील सोयाबीनवर फिरवले ट्रॅक्‍टर

मंगरूळ (ता. कळंब) ः सोयाबीनच्या उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर फिरवून पीक मोडीत काढताना शेतकरी.
मंगरूळ (ता. कळंब) ः सोयाबीनच्या उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर फिरवून पीक मोडीत काढताना शेतकरी.

मंगरूळ (जि. उस्मानाबाद) : परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने पिके धोक्‍यात आली आहेत. रविवारी (ता.11) येथील शेतकरी शिवाजी पाटील यांनी सहा एकरांतील सोयाबीन पिकावर ट्रॅक्‍टर फिरवून करपलेले पीक मोडीत काढले. ट्रॅक्‍टरला कुळवणी करण्याची औजारे जोडून सोयाबीन पीक मोडून काढले आहे. 

परिसरात यंदा एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. जून व जूलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्ट महिन्यात केवळ ढगाळ वातावरण आहे. आता तर वारे आणि ऊन पडल्याने पिकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. पिके सुकू लागली आहेत. पिकांवर अळ्यांच्या प्रादुर्भाव झाला आहे. 

पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थिती उद्‌भवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मंगरूळ परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पावसाअभावी सोयाबीन पिकांची वाढ खुंटली आहे. 

पिकांनी माना टाकल्या असून, सुकू लागली आहेत. सहा एकर पेरणी करण्यासाठी सोयाबीनच्या पाच बॅग, खत, एक वेळा फवारणी केली आहे. आतापर्यंत एकूण 50 हजार रुपये खर्च झाला आहे. रब्बी हंगामात पीक घेण्यासाठी ट्रॅक्‍टर फिरवून सोयाबीनचे पीक मोडीत काढल्याचे शिवाजी पाटील यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com