व्यापाऱ्यांनी भरला 40 लाखांचा कर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

करपात्र वस्तूची झालेली विक्री न दाखविता कर चुकवेगिरी केली जात असल्याची माहिती राज्यकर जीएसटीच्या अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याआधारे गुरुवारी (ता. 31) शहरातील तीन व्यापाऱ्यांच्या दुकानावर एकाच वेळी छापा टाकत तपासणी केली होती.

औरंगाबाद  : जुना मोंढा व परिसरातील तीन व्यापाऱ्यांनी सुमारे 40 लाख रुपयांचा कर अदा केला नसल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. याबाबत सर्व खरेदी विक्री पुस्तिका, बिले यांची तपासणी सुरु असून संबंधितांना बाजू मांडण्यासाठी सुनावणी घेतल्या जाणार असून तपासानंतरच करचुकवेगिरी झाली किंवा नाही हे समोर येईल, अशी माहिती राज्य कर विभागाच्या सुत्रांनी दिली. 

करपात्र वस्तूची झालेली विक्री न दाखविता कर चुकवेगिरी केली जात असल्याची माहिती राज्यकर जीएसटीच्या अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याआधारे गुरुवारी (ता. 31) शहरातील तीन व्यापाऱ्यांच्या दुकानावर एकाच वेळी छापा टाकत तपासणी केली होती. यात दोन किराणा दुकानदार असून एक सौंदर्य प्रसाधनाची एजन्सीचालकाचा समावेश आहे. खरेदी विक्रीसंबंधित सर्व बिले, नोंदवह्याची तपासणी केली असून महत्वाचे दस्तावेज ही पथकाने ताब्यात घेतले आहे. प्राथामिक तपासात कर व व्याज असे मिळून सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचा कर चुकविल्याचा अंदाज सुत्रांनी व्यक्त केला आहे. कर चुकवेगिरीचा प्रकार उघडकीस आल्यास देय करावर 25 ते 100 टक्के दंड आकारला जातो, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: Traders paid a tax of rupees forty lakh