यंत्रामुळे पारंपरिक घोंगडीवर संकट   

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : सर्वत्र यांत्रिकीकरण होत आहे. त्यातच ऊबदार घोंगडीही यंत्रावर तयार होऊ लागली आहे. त्यामुळे कारागिरांनी मेहनतीने हाताने विणलेल्या घोंगडीवर संकट आले असून, त्यांच्या उत्पन्नावर 50 टक्के परिणाम झाला आहे. 

पूर्वीपासूनच प्रत्येक घरात घोंगडीचा वापर होतो. राज्यात घोंगडीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. यामुळे धनगर बांधव आणि त्यांच्याशी मेंढी पालनाशी निगडित असलेले कारागीर हाताने घोंगडी विणतात; पण गेल्या दोन वर्षांपासून मशीनवर तयार होणारी घोंगडी बाजारात आली आहे. हाताने विणलेल्या घोंगडीपेक्षा ती स्वस्त आहे; मात्र तिचा दर्जा अस्सल घोंगडीसारखा नाही. त्यामुळे पारंपरिक घोंगडी उत्पादनावर परिणाम झाला असून, व्यवसाय धोक्‍यात आल्याचे अहल्यादेवी घोंगडी उत्पादन केंद्राचे दत्ता तोलाजी चाळके यांनी सांगितले. 

असा ओळखा फरक 
 - यंत्रावर तयार केलेल्या घोंगडीचा रंग गडद असतो. 
- ती हातात घेतल्यानंतर नरम लागते. 
- या घोंगडीला टार्च नसतो. 
- चरचरपणा नसतो. 
- यातून ऊब मिळत नाही. 
- तिची किमत 300 रुपयांपासून असते. 

मशीनवर तयार होणाऱ्या घोंगड्यांमुळे अस्सल घोंगडी उद्योग अडचणीत सापडला आहे. घोंगडीला कायम मागणी असल्याने मशीनवर तयार होणाऱ्या घोंगडीचे निर्माते आणि विक्रेते याचा फायदा घेत आहेत. 
- दत्ता चाळके, घोंगडी उत्पादक, ताडहादगाव, जि. जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com