फुलंब्री : विधानसभा मतदारसंघात काळे - बागडे परंपरागत लढत

नवनाथ इधाटे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांची चौथ्यांदा परंपरागत लढत होणार आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात 2004 पासून काळे - बागडे यांची सतत सरळ लढत झालेली आहे. 2014 च्या विधानसभेत डॉ.काळे यांचा केवळ तीन हजारांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता.

फुलंब्री, ता.7 (जि.औरंगाबाद) ः फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांची चौथ्यांदा परंपरागत लढत होणार आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात 2004 पासून काळे - बागडे यांची सतत सरळ लढत झालेली आहे. 2014 च्या विधानसभेत डॉ.काळे यांचा केवळ तीन हजारांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता. मात्र मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून डॉ.काळे सतत चर्चेत राहिले आहे. तर दुसरीकडे बागडे यांना थेट विधानसभा अध्यक्षपद पक्षाने बहाल केल्याने मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली.

या विधानसभेत वाढलेली बेरोजगारी, महागाई, औरंगाबाद - जळगाव महामार्गाची झालेली दुरवस्था, पीकविमा, फसवी कर्जमाफी हे मुद्दे घेऊन काँग्रेस प्रचारात उतवरली आहे. तर बागडे यांनी केलेल्या विविध रस्त्यांचे कामे, तालुक्यातील भव्य प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे इमारत, कर्जमाफी, पीक विम्याचा मोबदला आदी मुद्दे घेऊन भाजपचे उमेदवाराने निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे बागडे - काळे यांच्यात अत्यंत काट्याची महत्वपूर्ण लढत होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traditional Fight Between Kale-Bagde For Phulambri Constituency