औरंगाबादजवळ कायगाव पुलावरील वाहतूक वळवली

kakasaheb
kakasaheb

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा आज पहिला स्मृतिदिन असल्याने कायगाव पुलावर मराठा बांधवांची गर्दी आहे. औरंगाबाद-पुणे महामार्गावर हा पूल असल्याने औरंगाबादहुन येणारी वाहने गंगापूर फाट्यापासून वळविण्यात आली. तर, पुण्याहुन येणारी वाहने नेवासा फाट्यापासून वळवली आहे.

मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा कायगाव पुलावर (ता. गंगापूर) सोमवारी (ता. 22) रात्री पुतळा बसविण्यात आला. काकासाहेब यांचा आज (ता. 23) पहिला स्मृती दिन आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कानडगाव (ता. गंगापूर) येथील युवक काकासाहेब शिंदे यांनी इशारा देऊन 23 जुलै 2018ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास कायगाव पुलावरुन गोदावरी नदीत उडी घेतली होती. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले.

काकासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रेमींनी सोमवारी रात्रीच कायगाव पुलाच्या सुरवातीलाच चबुतरा उभारत काकासाहेब शिंदे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी हा पुतळा बसवला आहे. गेल्यावर्षीच्या घटनेनंतर कायगाव पुलाचे नामकरण 'हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू' असे करण्यात आले आहे. कायगाव पुलावर मराठा समाज बांधवांची गर्दी नसली तरी, तणावपूर्ण शांतता आहे.

क्युआरटी (दंगा काबू पथक) 3, वरुण वॉटर पॅनल 1, 
उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, 13 पोलीस उपनिरीक्षक, 240 कर्मचारी यांचा फौजफाटा आहे.
अग्निशमनचे वाहन, रबर बोट आणि अग्निशमनचे वाहन असून सोबत अधिकारी, कर्मचारी मिळून 15 जणांची टीम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com