माजलगावांत तीन तास वाहतूक ठप्प

पांडुरंग उगले
शनिवार, 18 मे 2019

माजलगाव (जि. बीड) : रस्त्यावरील दुचाकी बाजूला करण्याच्या कारणावरून वाहक आणि दुचाकीस्वरात बाचाबाची झाली. यात दुचाकीस्वाराने बस वाहकाच्या श्रीमुखात भडकावली तर चालकाचे कपडे काढले. याचा राग मनात धरून सर्वच बस चालक, वाहक एकत्र होऊन त्यांनी डेपोतील बस शिवाजी चौकातील रस्त्यात आडव्या लावून रास्तारोको सुरू केला आहे. यामुळे एक तासापासून शहरातील वाहतूक खोळंबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

माजलगाव बसस्थानाकातून सकाळी आठ वाजता आनंदगाव गाडी बाहेर पडत असताना रस्त्यात घायाळ नामक व्यक्तीने त्याची दुचाकी आडवी लावली होती. हॉर्न वाजावूनही तो बाजूला घेत नसल्याने आनंदगाव बस चे वाहक सुमंत वाघ गाडीखाली उतरून दुचाकीस्वाराला गाडी बाजूला घेण्याची विनंती करीत असताना त्याने वाहकाच्या श्रीमुखात भडकावली.

बसचे चालक नवनाथ मुंडे हे तात्काळ खाली उतरून गेले असता त्यांचेही कपडे फाडून धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे डेपोतील सर्वच वाहक, चालक एकत्र येऊन त्यांनी शिवाजी चौकात बस रस्त्यावर लावून रास्तारोको सुरू केला आहे. हा प्रकार एक, दिड तासापासून सुरू असल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक खोळंबली असून, दुचाकीस्वारावर कारवाई, अटक केल्याशिवाय गाड्या काढणार नसल्याचा पवित्रा वाहक, चालकांनी घेतला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic jam for 3 hours in Majalgaon