रस्ता रुंद होऊनही वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

बीड -  शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सुभाष रोडचे रुंदीकरण होऊनही येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. याठिकाणी रस्त्याच्या मधोमध चारचाकी वाहने उभी केली जात आहेत; तर दोन्ही बाजूने दुचाकी वाहने उभी करण्यात येत आहेत. यामुळे येथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

पूर्वी सुभाष रोडची रुंदी कमी होती तरीही वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, या ठिकाणच्या रस्त्याची रुंदी वाढवण्यात आल्यापासून हा रस्ता पार्किंग झोन झाला आहे. रस्त्याच्या मधोमध चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. तर, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी लावल्या जात आहेत. यामुळे याठिकाणी दररोजच वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. सध्या लग्नसराई सुरू असून ग्रामीण भागासह शहरातील नागरिक खरेदीसाठी येथे येतात. मात्र, येथील बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी पूर्वीप्रमाणे पी१ व पी२ हे नियम लागू करण्याची गरज आहे; तसेच या रस्त्यावर वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमण्याची गरज आहे. येथील व्यापाऱ्यांनीही वाहनांची पार्किंग योग्य रीतीने करण्याची गरज आहे.

उर्वरित कामे पूर्ण करण्याची मागणी
साठे चौक ते माळवेस चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु माळवेस चौकातून आंबेडकर चौकापर्यंतचे काम राहिलेले आहे. हे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

Web Title: Traffic jam in beed