वाहतूक पोलिसांचा कारभार "इनकॅमेरा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

बीड मराठवाड्यात पहिला, तर राज्यात दुसरा जिल्हा
बीड - वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांत नेहमीच कुरबुरी होतात. कधीकधी हुज्जत घालण्यापासून मारहाणीपर्यंतचे प्रकार घडतात. मात्र, वाहतूक पोलिसांच्या अंगाला कॅमेरे अडकविल्याने त्यांच्याकडूनही चुकीचे काम होणार नाही आणि वाहनचालकांकडून काही झाले तर तेही आता कॅमेऱ्यात बंद होणार आहे.

पारदर्शक कारभारासाठी असा उपक्रम राबविणारे बीड पोलिस दल राज्यात दुसरे, तर मराठवाड्यात पहिले ठरले आहे. मुंबईत अशी कामाची पद्धत सुरू आहे.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी यापूर्वी पोलिस कुटुंबीयांसाठी बगीचा, स्तनदा मातांसाठी कक्ष अशा विविध संकल्पना बीड पोलिस दलात राबविल्या आहेत. आता शहर वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी "बॉडी वॉर्न कॅमेरा' देण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलिस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालणे महागात पडणार आहे. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस अधीक्षक कार्यालयात राहणार असून, त्यावर बड्या अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.

दहा बॉडी वॉर्न कॅमेरे
सध्या शहरातील वाहतूक शाखेतील दहा कर्मचाऱ्यांना बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे येथील कामे पारदर्शक होतील व वाहतूक कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.

Web Title: traffic police work in camera