बीडमध्ये जीपच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू

बीडजवळील मांजरसुंबा येथील घटना
accident
accidentaccident

बीड: तालुक्यातील मांजरसुंबा येथे मालवाहू जीपने धडक दिल्याने जखमी झालेल्या महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ११) घडली (accident news in beed). सुदाम वनवे (वय ३६, रा. कचारवाडी, (ता. बीड) असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

सुदाम वनवे हे २०१० मध्ये पोलिस दलात रुजू झाले. सध्या त्यांची महामार्ग विभागाच्या मांजरसुंबा कार्यालयात पोलिस नाईक पदावर नेमणूक होती. कोरोनामुळे सध्या कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी धुळे- सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा येथे काल नियम डावलून धावणाऱ्या वाहनांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. चौसाळा बाह्यवळण रस्त्यावर सायंकाळी तपासणी सुरू असताना पाठोपाठ दोन जीप आल्या. सुदाम वनवे यांनी पहिली जीप कागदपत्रे तपासून सोडली. त्यानंतरच्या जीपने (एमएच-२८, बीबी-२५२९) धडक दिल्याने ते दुभाजकावर कोसळून गंभीर जखमी झाले.

accident
Corona Impact: लातुरात दीड हजारांवर उद्योगांची चाके थांबली, दहा हजार कामगार घरी

अन्य पोलिसांनी जीपसह चालक सुधाकर संतोष जंजाळ (३२, रा. सोनेवाडी, ता. चिखली जि. बुलडाणा) यास ताब्यात घेतले. जखमी वनवे यांना बीडच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. पुढील उपचारासाठी औरंगाबादला नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. सुदाम वनवे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com