वाहतूक पोलिसांचा कारभार ‘इन कॅमेरा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

सध्या जिल्ह्यात अनेक योजना राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत असुन आता वाहतुक शाखेतील कर्मचाऱ्यांसाठी बॉडीओन कॅमेराचा प्रयोग आम्ही करत करत असुन या परिणाम जर चांगला झाला तर अजुन या कॅमेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. य यासर्व कामात आम्हीला नागरीकांच्या सहकाऱ्यांची आवश्यका आहे.
- जी. श्रीधर (पोलिस अधिक्षक बीड)

- पारदर्शकतेसाठी बीड पोलिस दलाचे पाऊल
- बीड मराठवाड्यात पहिला तर राज्यातला दुसरा जिल्हा
- वाहन - चालक पोलिसांतील हुज्जत पडणार महागात

बीड: वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांत नेहमीच कुरबुरी होतात. कधी कधी हुज्जत घालण्यापासून मारहाणीपर्यंतचे प्रकार घडतात. पोलिसांवरही आरोप होतात. मात्र, वाहतूक पोलिसांच्या अंगाला कॅमेरे अडकविल्याने त्यांच्याकडूनही चुकीचे काम होणार नाही आणि वाहन चालकांकडून काही झाले तर तेही कॅमेऱ्यात बंद होणार आहे.

पारदर्शक कारभारासाठी बीड पोलिसांनी हा उपक्रम राबविला असून असा उपक्रम राबविणारे बीड पोलिस दल राज्यात दुसरे तर मराठवाड्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. मुंबईत अशी कामाची पद्धत सुरु आहे.

पोलिस दलात नवनवे उपक्रम राबवून पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आता वाहतूक शाखेचा कारभार कॅमेऱ्याच्या नजरेखाली आणला आहे. यापूर्वी पोलिस कुटूंबियांसाठी बगिचा, स्तनदा मातांसाठी कक्ष अशा विविध संकल्पना त्यांनी बीड पोलिस दलात राबविलेल्या आहेत. आता शहर वाहतुक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ‘बॉडीओन कॅमेरा’ देण्यात आला आहे. यामुळे आता वाहतुक पोलिस कर्मचाऱ्या सोबत हुज्जत घालणे महागात पडणार आहे. तर, गैरप्रकार करणे पोलिसांच्याही अंगलट येणार आहे. अनेक वेळा वाहतूक पोलिसांनी वाहन अडविल्यानंतर समारेच्या व्यक्तीकडून शिवीगाळीपासून मारहाणीच्या घटना घडतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या छातीवर अडकविलेल्या कॅमेऱ्यात असे प्रकार कैद होतील. तर, पोलिसांकडून चुकीचे बोलले तर त्याचा आवाजही यात रेकॉर्ड होईल. तसेच, पोलिसांचे हातही या कॅमेऱ्याच्या नजरेखाली असतील. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस अधीक्षक कार्यालयात राहणार असून त्यावर सतत बड्या अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.

सुरुवातीस वाहतुक शाखेत दहा बॉडी ओन कॅमेरे
सध्या शहरातील वाहतुक शाखेतील दहा कर्मचाऱ्यांना बॉडी ओन कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांना मुळे येथील पारदर्शक कामे होतील व वाहतुक कर्मचाऱ्यांवर वरीष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.

Web Title: traffice police work in camera