एकल महिला शिक्षिकांच्या कथाच बनल्या व्यथा! 

संदीप लांडगे  
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

औरंगाबाद- ऑनलाइन बदल्यांमध्ये पारदर्शकता आल्याचे दिसत असले, तरी यात राज्यभरातील विस्थापित आणि रॅण्डममध्ये आलेल्या एकल महिला शिक्षिकांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक शिक्षिकांना तब्बल 70 ते 100 किलोमीटरवरील गावे मिळालेली असून कुटुंब सांभाळून कर्तव्य बजाविताना त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे नवीन शिक्षक भरतीपूर्वी समानीकरणाच्या; तसेच रिक्त जागांवर प्राधान्याने पदस्थापना देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

बदली प्रक्रियेत चारपैकी सर्वांत शेवटच्या संवर्गात या शिक्षिकांचा समावेश असल्याने त्यांना प्राधान्यक्रमातील कुठल्याही गावची शाळा मिळत नाही. यंदा तर समुपदेशन प्रक्रियेत असलेली गावे अतिदूरवरील, दुर्गम भागातील होती. काही शाळांचे अंतर त्या राहत असलेल्या ठिकाणापासून 100 किलोमीटरपर्यंत आहे. अनेक एकल शिक्षिकांच्या घरात दुर्धर आजाराने ग्रस्त सदस्य आहेत. काहींची मुले-मुली लहान आहेत. हा सर्व व्याप सांभाळून अशा मनस्थितीत रोज एवढा दूर प्रवास करून अध्यापन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. महिला, ज्येष्ठांना प्राधान्य देण्याचे शासनाचे पूर्वीपासूनच धोरण आहे. त्यामुळे नवीन शिक्षक भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा आम्हाला उपलब्ध कराव्यात; तसेच विस्थापित पुरुष शिक्षकांचाही विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी ग्रामविकास विभागाकडे केली आहे. 

शिक्षक भरतीनंतर रॅण्डम दुरुस्तीचा शासन निर्णय आहे. त्यानुसार आम्हा अन्यायग्रस्त रॅण्डम महिला व पुरुष यांना समानीकरणाच्या जागा खुल्या करून दुरुस्तीने पदस्थापना द्याव्यात. दीड वर्षांपासून आम्ही दूरच्या गावी जाऊन अन्याय सहन करीत आहोत. शेकडो महिलांचे कुटुंब विस्कळित झाले आहे. 
-रॅण्डममधील आंतरजिल्हा बदली शिक्षिका 

 2019 मधील बदली प्रक्रियेत अनेकजणी विस्थापित शिक्षिका आहेत. काहींची मुले सव्वादाेन ते अडीच वर्ष वयाची आहेत. काहींच्या घरातील कुटुंबातील सदस्यांना दुर्धर आजार आहे. त्यांना केव्हाही रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा परिस्थितीत महिला शिक्षिका राेज दीडशे किलोमीटर प्रवास करून कर्तव्य बजावत आहेत. नवीन शिक्षक भरतीमुळे त्यांना पदस्थापना बदलून मिळण्याची एक संधी आलेली आहे. ती देऊन न्याय द्यावा.'' 
-विस्थापित शिक्षिका.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tragedy has become the story of single female teachers

फोटो गॅलरी