
केज : एका खडी क्रेशरवर सौर उर्जा पॅनल बसवण्याच्या कामावर असलेल्या अभियांत्रिकी शाखेतून पदवी घेतलेल्या खासगी अभियंत्याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी (ता.१३) कानडी माळी येथे घडली. मृत्यू झालेल्या अभियंता तरूणाचे नाव सचिन केरबा गोरे (वय-२५) रा. अवंतीनगर, बार्शी रोड, लातूर ) असे आहे. मृतदेह खदानीतील पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अग्नीशामक दल व खासगी पाणबुडीच्या जवानांना रात्री उशीरा यश आले.