अंबाजोगाईत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा अधिष्ठाता कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

अंबाजोगाई (जि. बीड) :  सहायक प्राध्यापकांच्या जागेवरील बंदी तत्काळ उठवावी या व इतर मागण्यांसाठी स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बुधवारी (ता. १३) सकाळी अधिष्ठाता कार्यालयावर मुकमोर्चा काढला. मागण्यांचे निवेदनही अधिष्ठातांना दिले.

सुधारित आकृतीबंध नियंत्रित करण्याच्या नावाखाली शासनाने प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी घालून पिएच.डी., नेट, सेट धारकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. शासनाने दखल घेवून सहायक प्राध्यापकांच्या जागेवरील ही बंदी उठवावी अशी मागणी करत डॉक्टरांनी निदर्शने ही केली. मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता सुधीर देशमुख यांना दिले. 
या मोर्चात मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते.

Web Title: A trainee doctor march on office of the deen in Ambajogai