प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांचा संप सुरूच राहणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

औरंगाबाद - प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांच्या "असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स'ने (अस्मी) बुधवारपासून (ता. 13) संप पुकारला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी नागपूर येथील चर्चेत वाढीव विद्यावेतन वैद्यकीय शिक्षण खात्याने त्यांच्या बजेटमधून देण्याची भूमिका मांडली. हा प्रश्‍न वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्टात टोलवल्याने रविवारी (ता. 17) पाचव्या दिवशीही संप सुरूच होता. विद्यावेतन वाढवण्यासाठी राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी बुधवारपासून संप पुकारला आहे.
Web Title: trainee doctor strike