विद्यावेतनात वाढीसाठी घाटीतील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर

योगेश पायघन 
बुधवार, 13 जून 2018

घाटीत अकरा वाजता रॅली 
सध्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 5 हजार 800 रुपये विद्यावेतन मिळते ते 12 हजार मिळावे अशी  अस्मिची मागणी आहे. या मागण्यांना शासन कसा प्रतिसाद देते त्यावर या संपाचे भविष्य आहे. या मागण्यांसाठी घाटी परिसरात आज सकाळी अकरा वाजता रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांना निवेदन देण्यात येणार  असल्याचे अस्मिचे सहसचिव डॉ. किशोर डुकरे म्हणाले. 

औरंगाबाद : विद्यावेतनात वाढ करावी या मागणीसाठी राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आजपासून संपावर गेले आहेत. यासंदर्भात असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न (अस्मि) च्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मंगळवारी (ता 12) घाटीच्या कॉलेज कौन्सिल ला पत्र दिले होते. त्यानंतर रात्री बारा वाजेपासून हे डॉक्टर संपावर गेल्याची माहीती घाटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ भारत सोनवणे यांनी सांगितले.

घाटीत अगोदरच मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यात निवासी डॉक्टरांना मदतीचा हात देणारे सुमारे 200 प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेवर काहीसा परिणाम जाणवत आहे. सकाळी नऊ वाजेनंतर ओपीडी व ऍडमिशनचे पेशंट वाढतील शिवाय अपघात विभागातील रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णांचे हाल होऊ शकतात. त्या दृष्टीने घाटीने खबरदारी घेतली असून प्राध्यापकाना विशेष लक्ष देण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सध्या कोणतीही अडचण नसल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सरफराज यांनी सांगितले. 

विद्यावेतनाच्या वाढीसाठी घाटीतील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर. आज सकाळी अकरा वाजता असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नची (अस्मि) रॅली. सध्या विद्यावेत 5,800 ते 12 हजार करण्याची मागणी करण्यात येत आहे.

घाटीत अकरा वाजता रॅली 
सध्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 5 हजार 800 रुपये विद्यावेतन मिळते ते 12 हजार मिळावे अशी  अस्मिची मागणी आहे. या मागण्यांना शासन कसा प्रतिसाद देते त्यावर या संपाचे भविष्य आहे. या मागण्यांसाठी घाटी परिसरात आज सकाळी अकरा वाजता रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांना निवेदन देण्यात येणार  असल्याचे अस्मिचे सहसचिव डॉ. किशोर डुकरे म्हणाले. 

Web Title: trainee doctors strike in Aurangabad