'डिजिटल' शेतीवरील प्रशिक्षण केंद्र परभणीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेला "कृषी उत्पादकता वाढीसाठी यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती' यावरील "सेंटर ऑफ एक्‍सेलन्स' हा प्रशिक्षण प्रकल्प सादर केला होता. त्याला परिषदेने मंजुरी दिली. त्यामुळे डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित देशातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र येथे स्थापन होणार आहे.

परभणी - परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेला "कृषी उत्पादकता वाढीसाठी यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती' यावरील "सेंटर ऑफ एक्‍सेलन्स' हा प्रशिक्षण प्रकल्प सादर केला होता. त्याला परिषदेने मंजुरी दिली. त्यामुळे डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित देशातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र येथे स्थापन होणार आहे.

प्रगत देशांत कृषिक्षेत्रामध्ये यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्रांचा वापर वाढत आहे. डिजिटल शेती करून शेतकरी अधिक, दर्जेदार कृषी उत्पादन करीत आहेत. भारतीय शेती, शेतकऱ्यांची स्थिती अनुकूल बनविण्याची या डिजिटल तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी लागणारे उच्चतम कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची निर्मिती करावी लागणार आहे. हा दृष्टिकोन ठेवून येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने याबाबतचा प्रस्ताव भारतीय कृषी संशोधन परिषदेस सादर केला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी परभणी कृषी विद्यापीठाने ऍग्री-रोबोट्‌स, ऍग्री-ड्रोन्स, ऍग्री-स्वयंचलित यंत्राच्या तंत्रज्ञानात्मक देवाण-घेवाणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी; तसेच स्पेन, युक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांशी सामंजस्य करार केला आहे.

प्रशिक्षणाची सुविधा
हा प्रशिक्षण प्रकल्प 2019 ते 2022 या तीन वर्षांसाठी असून 18 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात यंत्रमानव (रोबोट), ड्रोन व डिजिटल साधनांचा समावेश असणाऱ्या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थी, संशोधक प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Training Center in Parbhani on Digital Agriculture