कौशल्य विकास अभियानाद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार : मुख्यमंत्री

शिवचरन वावळे
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नांदेड : पूर्वजांनी विज्ञानावर आधारित शेती करण्यावर भर दिला होता. त्यामुळे शेतीतून योग्य असे पीक मिळत होते. परंतु मधल्या काही दशकात शेती करण्याचे स्वरुप आणि पद्धतीत बदल झाला. यामुळे शेती आणि निसर्गचक्र बदलल्याने शेतीचा शाश्वत विकास घसरला आहे. शेतीचा शाश्वत विकास साधण्यासाठी व शेती क्षेत्रात परिवर्तनाची नवी पहाट घेऊन येण्याच्या हेतूने शेतकऱ्यांना कौशल्य विकास अभियानाद्वारे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ क्रॉन्फ्रसिंगद्वारे संवाद साधताना सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना व छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. योजनेचा आजपासून शुभारंभ झाल्याची घोषणा केली. यावेळी कौशल्य विकास विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांची उपस्थित होते. यावेळी नांदेड येथील मातोश्री प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की महसूल मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा अाधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करुन त्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे व शेती विकासात भरभराटी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीपासून ते उत्पन्न काढण्यापर्यंत आणि मालाची बाजारपेठ व पॅकेजिंग करणे या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरुण शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: Training for farmers through skill development campaign says Devendra Fadnavis