राज्यातील 155 सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या बदल्या

सुषेन जाधव
गुरुवार, 13 जून 2019

राज्यातील 155 सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : राज्यातील 155 सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 55 जणांच्या विनंतीवरून करण्यात आल्या तर उर्वरित प्रशासकीय बदल्या केल्या आहेत.

मराठवाड्यातील 28 सहाय्यक सरकारी अभियोक्ताचा समावेश आहे. औरंगाबाद देतील 6 अभियोक्ताच्या बदल्या झाल्या आहेत. (कंसात बदलीचे ठिकाण अ‍ॅड. देवेंद्र वैद्य (औरंगाबाद), अ‍ॅड. मनिषा गंडले (जालना), अ‍ॅड. नितीन कांघे (पुणे), अ‍ॅड. शोभा विजयसेनानी (जालना), अलकनंदा पुंदे (पुणे), महेश मालाणी (वर्धा) यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आलेले सहाय्यक सरकारी वकीलांमध्ये अ‍ॅड. अशोक सोनवणे, अ‍ॅड. दिलीपसिंग राठोड, अ‍ॅड. नितीन घोगडे, अ‍ॅड. जयमाला राठोड, अ‍ॅड. योगेश सरोदे, अ‍ॅड. श्री संजय, अ‍ॅड. रविंद्रसिंग देवरे, अ‍ॅड. निता किर्तीकर या आदिजनांचा समावेश आहे.

सर्व सहायक अभियोक्ता यांच्या बदल्या जिल्ह्यात करण्यात आल्या असून जिल्हाभरात कोणत्याही ठिकाणी पदस्थापना करण्याचा अधिकार संचालक अभियोग संचालनालय यांच्याकडे आहे. ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे, असे आदेश गृह विभागातील विधी विभागाच्या उपसचिवांनी दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of 155 Assistant Government Executives in the State