औरंगाबाद विभागातील ५० नायब तहसीलदारांच्या बदल्या

राजेश दारव्हेकर | Monday, 2 November 2020

मागील महिन्यात पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार संवर्गातील बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर आता नायब तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या आहेत.

हिंगोली : गेल्या महिन्यापासून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे वारे वाहू लागल्याने पुन्हा एकदा राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी वि. पी. थोरात यांनी औरंगाबाद विभागातील नायब तहसीलदार यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आठ नायब तहसीलदार यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या आहेत.

मागील महिन्यात पोलिस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार संवर्गातील बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर आता नायब तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्यातील आठ नायब तहसीलदार यांची जिल्हानंतर्गत बदली झाली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील सुनील कावरखे यांची हिंगोली तहसील कार्यालयात पुरवठा विभागात करण्यात आली. तर तहसील कार्यालय औंढा नागनाथ महसूल विभागातील व्ही. यू. भालेराव यांची अप्पर तहसीलदार म्हणून गोरेगाव येथे बदली झाली. याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागात कार्यरत असलेले व्ही. व्ही. तेलंग यांची कळमनुरी तहसील कार्यालयात करण्यात आली. 

हेही वाचा -  हिंगोली : जिल्ह्याची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ४८.३५ टक्के

Advertising
Advertising

तसेच कळमनुरी तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत असलेले एस. सी. पाचपुते यांची कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालय येथे करण्यात आली. तर वसमत तहसील कार्यालयातील महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार सचिन जैस्वाल यांची जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो विभागात झाली. तर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले राजेंद्र गळगे यांची हिंगोली तहसील कार्यालयात संगायो विभागात बदली झाली.

 त्याचप्रमाणे हिंगोली तहसील कार्यालयातील एस. जी. खोकले यांची कळमनुरी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात कार्यरत असलेले यू. आर. बोथीकर यांची सेनगाव तहसील कार्यालय येथे करण्यात आली.

संपादन - प्रल्हाद कांबळे